सहकारी साखर कारखान्यांना अल्पमुदत कर्ज, खेळते भांडवली मालताबेगहाण, नजरगहाण व मुदती कर्जपुरवठा केला जातो.
सहकारी सुतगिरण्यांची नोंदणी हि हातमाग, यंत्रमाग व सहकारी गिरणी संचालक, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत केले जाते. सदरचे प्रकल्प हे कमीत कमी २५००० चात्यांची असतात. अशा प्रकारच्या सुत गिरण्यांना जिल्हा बँकेमार्फत खालील प्रकारची कर्जे मंजूर करणेचे धोरण आहे.
कच्चा मालावर प्रक्रिया करून उत्पादित होणारा पक्का माल विक्री करणाऱ्या संस्था तसेच तयार मालावर प्रक्रिया करून उत्पादित होणारा पक्का माल विक्री करणाऱ्या संस्था प्रक्रिया संस्थांमध्ये मोडतात अशा संस्थेची नोंदणी दाखला व पोटनियमातील वर्गीकरण या ठिकाणी प्रक्रिया संस्था अशी नोंद असणे आवश्यक आहे. अशा संस्थाना खालील प्रमुख कारणांसाठी कर्ज मंजूर करणेचे बँकेचे धोरण आहे.
विकास सोसायट्यामार्फत पात्र सभासदांना वाहन खरेदी, दुचाकी / चारचाकी (जीप, कार, तीन / चारचाकी मालवाहतूक वाहन, जे.सी.बी अश्या स्वरूपाच्या) खरेदीसाठी बँक कमाल २५ लाखांपर्यंतचा कर्ज पुरवठा.
जिल्ह्यातील प्राथमिक सेवा सहकारी सोसायटीचे सभासदांना घर बांधणी करणेसाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. यासाठी इस्टीमेटच्या ७५% इतपत मात्र जास्तीत जास्त १५ लाख इतके कर्ज १० वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाईल.
बँकेमार्फत लघु उद्योगांसाठी कर्ज पुरवठा केला जातो.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच परदेशातील नावाजलेल्या विद्यापीठातील नाविन्यपूर्ण विशिष्ट पदव्युत्तर शिक्षणसाठी विकास सोसायट्यामार्फत बँक कर्ज पुरवठा करते.
क्लिन कॅश क्रेडीट :- मुदत - १ वर्ष, व्याजदर - १४ % (हा प्रचलित दर आहे)
अडत क्लिन :- मुदत - १ वर्ष, व्याजदर - १४ % (हा प्रचलित दर आहे)
नजरगहण कर्जमर्यादा :- मुदत - १ वर्ष, व्याजदर - १४ % (हा प्रचलित दर आहे)
मुदत - ५ वर्ष, व्याजदर - १४ % (हा प्रचलित दर आहे)
क्लीन कॅश क्रेडीट कर्ज मालताबेगहाण, नजरगहाण कर्ज मध्यम मुदत कर्ज :- (संस्थाच्या विस्तारासाठी)
नागरी सहकारी बँकांना सोने तारण, हळदमाल ताबेगहाण, व लघुउद्योजकांना दिलेल्या कर्जावर फेर नजरगहाण कर्जे तसेच विशेष बाबीनअतर्गत लिक्विडीटीसाठी स्पेशल क्लीन कर्जपुरवठा.
नागरी सहकारी पतसंस्थासाठी कॅश क्रेडीट, इमारत बांधणी साठी व इतर बाबींसाठी बँक कर्ज पुरवठा.
बँकेमार्फत सहकारी पतसंस्थासाठी कॅश क्रेडीट कर्ज पुरवठा.
बॅंकेकडील कायम ठेवीच्या ८५% पर्यंतची रक्कम कर्ज म्हणून देणेत येईल यासाठीचा व्याजदर व अटी बँकेच्या ज्या - त्यावेळच्या धोरणानुसार राहतील.
क्लीन कॅश क्रेडीट
दुध पुरवठा सोसायट्याना सभासदांना बिल पेमेंट करणे, पशुखाद्य खरेदी विक्री व्यवहार करणेकमी तसेच मिल्क प्रॉडक्ट, गोडावून व ऑफिससाठी उपयुक्त असणाऱ्या मशिनरीच्या खरेदीसाठी बँकेमार्फत कर्जपुरवठा.
ठेवीदारांना त्यांचे आकस्मित कारणासाठी किंवा थोड्या दिवसांच्या गरजेसाठी तात्पुरत्या स्वरुपात पैशाची गरज भासते. अशावेळी ठेव पावती मुदती पूर्वी मोडल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी बँकेमार्फत ठेवीदाराला ठेव तारण कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे
कायम ठेव पावती तारणावर ठेवीच्या ८०% पर्यंत कॅश क्रेडीट कर्ज मर्यादा बँकेकडून मंजूर केली जाते.
ग्राहकांसाठी बँकेमार्फत सोने तारण कर्ज उपलब्ध करणेत आले असून याची मुदत एक वर्ष ठेवणेत आली आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही सज्ञान रहिवासी व्यक्तीस सोने तारण ठेवून कॅश क्रेडीट कर्ज घेता येईल, यासाठी जास्तीत जास्त ५,००,००० रुपये मर्यादा राहील.
बँकेच्या सेवेत कायम असणाऱ्या सेवकांना बँकेमार्फत वाहन खरेदी, घर बांधणी, घर/फ्लॅट खरेदी इत्यादीसाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो.
बँकेच्या सेवेत कायम असणाऱ्या सेवकांना बँक सवलतीच्या दरात गृहउपयोगी वस्तू खरेदी, किंवा कॉम्पुटर खरेदी, पाल्याचे शिक्षण अथवा मुलीचे लग्न इत्यादी कारणांसाठी कर्ज पुरवठा.
जिल्हयातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक, प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना मिळणाऱ्या दरमहाच्या पगार रकमेच्या तारणावर बँकेचे थेट कर्ज पुरवठा योजनेखाली मुदती कर्ज, वाहन खरेदी, घरबांधणी, घर / फ्लॅट खरेदीसाठी बँकेकडून थेट कर्ज पुरवठा केला जातो या बाबतचे धोरण पुढील प्रमाणे... १) प्रत्येक नोकरास जास्तीत जास्त रु. २५.०० लाख मात्र रकमे पर्यंत मुदती कर्ज दिले जाईल २) सदरचे कर्ज १० वर्षे मुदतीने कर्ज देणेचे धोरण असून परतफेड मासिक हप्त्याने करणेचे आहे. ३) व्याजदर द.सा.द.शे.११.०० % आहे.
शासन, राष्ट्रीय बँक व राज्य सहकारी बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सन १९९९-२००० पासून बँकेने स्वयंसहायता गट निर्मिती करून त्यांचे संगोपन करणे, देखभाल करणे, आर्थिक सहाय्य व सुविधा उपलब्ध करून देनेचे धोरण स्वीकारले आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियान, ए. पी. एल., व बी. पी. एल. अंतर्गत आत्तापर्यंत २५ ,००० हून अधिक बचतगटांना बँकेने कर्जपुरवठा केला असून याची एकत्रित रक्कम सुमारे १२५ कोटी इतकी आहे.
जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, व्यावसाईक कामगार अश्या सभासदांना स्वायत्त रोजगार निर्मितीसाठी कर्ज देवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न बँक, नाबार्ड च्या सहायाने करत आहे. वय वर्षे १८ ते ५५ च्या मधील एकाच भागात राहणाऱ्या ४ ते ६ व्यक्तींच्या गटाला प्रती व्यक्ती रुपये ३०,०००/- ते ५०,०००/- पर्यंत कर्ज पुरवठा केला जातो.
कॉपीराइट २०२१ © सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली. सर्व हक्क राखीव.
Design and Developed By: Techcube Infosolutions Pvt. Ltd.